पोलिस प्रशासन न्यूज.

चार राज्यांत तपास करून विश्रामबाग पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला; रजिया सुलतान गँगमधील दोन आरोपी गाझियाबादमधून जेरबंद!


पुणे : टीम (लोक मिरर टाइम्स) दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश अशा चार राज्यांत सलग तपास मोहीम राबवत विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून अटक केली आहे. हबीब हफीज सैफी आणि अकबर ऊर्फ फिरोज सुलतान सैफी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, ते रजिया सुलतान गँगमधील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुरनं. ३२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी घरात नसताना अज्ञात आरोपींनी घराचा दरवाजा तोडून दागिन्यांची चोरी केली होती. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नियोजन केले. तपासादरम्यान पोलीस अंमलदार अर्जुन थोरात यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून संशयित आरोपींची छायाचित्रे एकत्रित केली. दरम्यान, पोलीस हवालदार नितीन मुंढे आणि पोलीस अंमलदार अनिस शेख यांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयित आरोपी हे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर विशेष तपास पथक दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांत रवाना करण्यात आले. दिनांक २३ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत स्थानिक पोलिसांची मदत घेत तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्यात आला. अखेर हबीब हफीज सैफी आणि अकबर ऊर्फ फिरोज सुलतान सैफी या दोघांना गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथून जेरबंद करण्यात आले. त्यांना पोलीस कोठडीत घेऊन तपास केला असता ते रजिया सुलतान गँगमधील असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत गुन्ह्यातील सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे आणि रमेश लाहिगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबुब मोकाशी तसेच पोलीस अंमलदार सचिन कदम, नितीन मुंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशिकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकीर मणियार, फिरोज इनामदार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, अर्जुन थोरात  यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!