पोलिस प्रशासन न्यूज.

मोक्का अंतर्गत गंभीर गुन्ह्यातील सात महिन्यांपासून फरार आरोपीला युनिट ३ गुन्हे शाखेकडून अटक


पुणे : मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या सात महिन्यांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ३ पथकाने डेक्कन परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. मनिष शांताराम गंगावणे (वय ३०, रा. वारजे माळवाडी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

वारजे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) १९९९ च्या कलम ३(१)(ii), ३(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून मनिष गंगावणे हा फरार होता. त्याचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अत्रे व पथक नन्हे पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार किशोर शिंदे, कैलास लिंबण व योगेश झेंडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फरार आरोपी मनिष गंगावणे हा डेक्कन येथील चौपाटी परिसरात आला आहे.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ शेलार मामा चौकाजवळ, डेक्कन येथे धाव घेतली. बिग अंडा राईस हॉटेलच्या पाठीमागे बसलेल्या मनिष गंगावणे याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला सहाय्यक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्रीमती तेजस्विनी सातपुते, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. गोहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस निरीक्षक प्रशांत अत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार किशोर शिंदे, कैलास लिंबण, अतुल साठे, विपुल गायकवाड, पुरुषोत्तम गुनला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे व आशीष राठोड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!