पोलिस प्रशासन न्यूज.

पुणे गुन्हे शाखेची कारवाई! अभिलेखावरील गुन्हेगाराकडून दोन पिस्टल व दोन काडतुसे जप्त; ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत


पुणे |लोक मिरर टाइम्स  प्रतिनिधीपुणे शहरात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखा युनिट २ ने कारवाई केली असून, अभिलेखावरील एका गुन्हेगाराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी व अंमलदार पाहिजे व फरारी आरोपी तसेच अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी करीत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलिक व सर्जेराव सरगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रभागा चौकाजवळील महानगरपालिका मैदानात एक इसम अवैधरीत्या अग्निशस्त्रे बाळगून फिरत आहे.

या माहितीच्या आधारे युनिट २ च्या पथकाने तात्काळ छापा टाकून अर्थव सोपान मारणे (वय १९, रा. राजविलास कॉम्प्लेक्स, भारती विद्यापीठ, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्टल व दोन काडतुसे असा एकूण ८०,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७४/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल

ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा, तर सांगवी व चिखली पोलीस ठाण्यांत शस्त्र अधिनियम कलम ३(२५) अन्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.   ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोहार, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर नेवसे, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सर्जेराव सरगर, नागनाथ राख, ओमकार कुंभार, संतोष टकले, शंकर कुंभार, आशिष यादव व साधना ताम्हाणे यांनी सहभाग घेतला.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!