पोलिस प्रशासन न्यूज.

धायरी गावात दोन धारदार लोखंडी कोयते जप्त; एक आरोपी जेरबंद, विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात


पुणे | प्रतिनिधी लोक मिरर टाइम्स पुणे शहरातील धायरी गावातील बेनकर वस्ती परिसरात दोन धारदार लोखंडी कोयते बाळगणाऱ्या दोघांवर गुन्हे शाखा युनिट-३ ने कारवाई केली आहे. या कारवाईत १८ वर्षे १० महिने वयाच्या हेमंत पुरुषोत्तम वाणी याला अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन लोखंडी धारदार कोयते जप्त करण्यात आले आहेत.

दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे व पोलीस अंमलदार यांचे पथक वरिष्ठांच्या आदेशानुसार नऱ्हे व नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाहिजे आरोपींचा शोध, अवैध धंद्यांची तपासणी व गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत होते. यावेळी धायरी गावातील बेनकर वस्ती परिसरात पोलीस अंमलदार मनोज पवार व अमित बोडरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धायरेश्वर मंदिराजवळील शिव भैरव कुस्ती आखाड्याच्या मैदानात दोन इसम धारदार कोयते घेऊन बसले आहेत. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता माहितीतील वर्णनाचे दोन इसम मैदानात दिसून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दोन लोखंडी धारदार कोयते जप्त करण्यात आले. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. कारवाईत सहभागी अधिकारी व पोलीस अंमलदार : पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार मनोज पवार, अमित बोडरे, , पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे व तुषार किंद्रे.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!