पोलिस प्रशासन न्यूज.

वाकड पोलिसांची दमदार कामगिरी; ६ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन गुन्हे उघडकीस


पिंपरी चिंचवड: टीम (लोक मिरर टाइम्स) वाकड येथील भूमकर चौकातील पु. ना. गाडगीळ (P.N.G.) ज्वेलर्समध्ये सणासुदीच्या गर्दीचा फायदा घेत दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपीसह दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. दसरा आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घडलेल्या दोन चोरीच्या घटनांचा तपास करत पोलिसांनी एकूण ६ लाख ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढला. आरोपी दुसऱ्या राज्यात जाऊन लपले होते. महाराष्ट्रात परतताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.अटक आरोपी धनराज विजय परमार (वय ४८) सुचित्रा किशोर साळुंखे (वय ७५)

 अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन :पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, पोलीस उपनिरीक्षक मारणे तसेच सहाय्यक फौजदार दळे, वंदू गिरे, मो. नदाफ, विजय मोरे, सचिन गायकवाड, दीपक साबळे, विजय घाडगे, विजय भुसारे, विक्रम भगत, कौतेंय खराडे, ज्ञानदेव झेंडे, कारभारी पालवे, समाधान कांबळे, प्रमोद गायके, अभिषेक मांडे आणि मंगेश लोखंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!