पुणे : लोक मिरर टाइम्स ऑनलाइन लिंकवर क्लिक केल्यामुळे एक लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झालेल्या येरवडा येथील सूरज पाटील यांना येरवडा पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने मोठा दिलासा दिला आहे. पोलिसांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे फसवणूक झालेली संपूर्ण एक लाख रुपयांची रक्कम अर्जदाराला परत मिळवून देण्यात यश आले आहे.
येरवडा पोलीस स्टेशन येथे सायबर अर्ज क्रमांक 21911250124096/2025 अन्वये सूरज पाटील (रा. येरवडा, पुणे) यांनी ऑनलाइन लिंकवर क्लिक केल्यामुळे एक लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत येरवडा पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने संबंधित बँक व मर्चंट यांच्याशी पत्रव्यवहार केला. तसेच फोनद्वारे सातत्याने संपर्क साधून आवश्यक पाठपुरावा केला. पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आले असून अर्जदाराची फसवणूक झालेली संपूर्ण ₹1,00,000 रक्कम परत मिळवून देण्यात आली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ चिलुमुला रजनिकांत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग सुनील जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शारदा कोकाटे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, पोलीस हवालदार समीर पिलाने (1481), पोलीस अंमलदार मनोज भागवत (1029), स्वप्निल पिंगळे (10745) आणि विजय माने यांनी ही कामगिरी पार पाडली.
सायबर फसवणुकीच्या प्रकरणात तत्परतेने कार्यवाही करून नागरिकांची संपूर्ण रक्कम परत मिळवून दिल्याबद्दल येरवडा पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.












