पोलिस प्रशासन न्यूज.

१०० हून अधिक CCTV फुटेज तपासले; बुलेट चोराला खडक पोलिसांनी पकडले


४८ तासात कौशल्यपुर्ण तपास करुन बुलेट चोरास केले जेरबंद
दि.१९/०९/२०२६ रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, दिनांक १३/०९/२०२६ रोजी रात्रौ २१/३०
वा.ते २३/३० वा. मोहन मेटल वर्क्स भवरी आळी रविवार पेठ पुणे सार्वजनिक रोड लगत लॉक करुन पार्क
केली बुलेट दुचाकी अज्ञात इसमाने चोरी केले बाबत खडक पो स्टे पुणे येथे गुन्हा रजि नं ५१२ /२०२६
भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास
खडक पोलीस स्टेशन कडील तपास पथक करीत होते.
दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस स्टेशन हद्दीमधील तसेच आजु बाजुच्या परिसरातील १००
पेक्षा जास्त सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करुन तसेच आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेत
असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार मयुर भोसले व उमेश मठपती यांना त्याच्या
बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे सदरचा गुन्हा इसम नामे शुभम पोतदार याने केला
असल्याचे समजुन आल्याने त्याचा उंड्री या भागात जावुन शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव
विचारता त्याने त्याचे नाव शुभम अशोक पोतदार वय- २९ वर्षे रा. येळवी, मारुती मंदीराजवळ, ता. जत,
जि. सांगली असे असल्याचे सांगितले, त्याच्याकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने तपास करता त्याने सदरचा
गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्ह्यात दि. २३/०९/२०२६ रोजी अटक केली असुन पोलीस
अटकेत असताना त्याने दाखल गुन्ह्यातील चोरी केलेली ३०,०००/- रुपये किंमतीची बुलेट दुचाकी सादर
केल्याने ती जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री राजेश बनसोडे, मा.
पोलीस उप आयुक्त, परि १ श्री. कृषिकेश रावले, व मा. सहा पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग श्री. सचिन
हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. धंजनय पिंगळे पोलीस
निरीक्षक (गुन्हे), श्रीमती शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. समाधान पवार, सहा पोलीस निरीक्षक
प्रसन्न जहाड, पोलीस उप निरीक्षक, महेंद्र कांबळे, राहुल मखरे, सहा पोलीस उप निरीक्षक, विनोद शिंदे व
पोलीस अंमलदार मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, उमेश मठपती, सैपुनमुलुख
नदाफ, विकास पांडोळे, यांच्या पथकाने केली आहे.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!