पुणे :- ( टीम लोक मिरर टाइम्स) मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात गेल्या एक वर्षापासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने कोंढवा परिसरातून ताब्यात घेत अटक केली. आकाश किशोर नवगीर (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट-२चे पथक दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी हद्दीतील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार आशिष यादव आणि पोलीस हवालदार कुंदन शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मार्केटयार्ड पोलीस ठाणे गु.र.नं. १८८/२०२५, बीएनएस कलम ११८(२), ३(५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आकाश नवगीर हा कात्रज-कोंढवा रोडवरील म्हसोबा मंदिराजवळ, गल्ली नं. ९, टिळेकरनगर, कोंढवा परिसरात आहे.
ही माहिती युनिट-२चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत बातमीच्या ठिकाणी जाऊन आरोपी आकाश नवगीर याला त्याच्या राहत्या घराजवळून ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची ओळख पटवून चौकशी केली असता त्याने आपले नाव आकाश किशोर नवगीर, वय २७ वर्षे, रा. कात्रज-कोंढवा रोड, म्हसोबा मंदिराजवळ, गल्ली नं. ९, टिळेकरनगर, कोंढवा, पुणे असे सांगितले. त्यानंतर त्याला मार्केटयार्ड पोलीस ठाणे गु.र.नं. १८८/२०२५ मधील गुन्ह्यात अटक करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त, गुन्हे गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोहार, सपोउपनि शंकर नेवसे तसेच पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, महेश मंडलिक, ओमकार कुंभार, शंकर कुंभार, योगेश मांढरे, उज्वल मोकाशी, विजय पवार, संदीप शिर्के, संतोष टकले, सर्जेराव सरगर, शिवानंद कायगुडे, विद्या शिंदे आणि आशिष यादव यांनी सहभाग घेतला.














