पोलिस प्रशासन न्यूज.

कसबा गणपती मंदिरातील दानपेटी फोडून 60 हजारांची चोरी; आरोपी आठ तासांत जेरबंद


पुणे : (टीम लोक मिरर टाइम्स) पुण्यातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरातील दानपेट्या फोडून रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला फरासखाना पोलिसांनी अवघ्या आठ तासांत ताब्यात घेत गुन्ह्याचा छडा लावला.
दिनांक 5 ऑक्टोबरच्या रात्री साडेअकरा ते 6 ऑक्टोबरच्या पहाटे सव्वापाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कसबा गणपती मंदिराच्या आवारात प्रवेश केला. मंदिराच्या गाभाऱ्याची कडी तोडून आत प्रवेश करत लाकडी दानपेटीसह गाभाऱ्यासमोरील दोन दानपेट्या तसेच मारुती मंदिरासमोरील पत्र्याची दानपेटी लोखंडी रॉडच्या सहाय्याने उचकटण्यात आली. या दानपेट्यांमधील अंदाजे 50 ते 60 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली.
याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मंदिराकडे येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. तसेच गुन्ह्याच्या वेळेतील संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संग्राम राजेंद्र जाधव (वय 29, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त ऋषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, पोलीस निरीक्षक राजेश महाला, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रविण पासलकर, महेश राठोड, सुमित खुट्टे, प्रशांत पालांडे, श्रीकांत वाघवले, विशाल शिंदे, विशाल औटी, नितीन तेलंगे, गजानन सोनुने, नितीन जाधव आणि चेतन होळकर यांनी ही कारवाई केली.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!