पोलिस प्रशासन न्यूज.

विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी” भारतीय चलना सारख्या दिसणाऱ्या बनावटी नोटा बनवणारे ४ आरोपी जेरबंद करुन


पुणे | टीम(लोक मिरर टाइम्स  पुणे)शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने भारतीय चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा तयार करून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ५०० रुपयांच्या एकूण १ हजार १२८ बनावट नोटा, म्हणजेच दर्शनी मूल्याप्रमाणे ५ लाख ६४ हजार रुपयांच्या नोटा, तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कलर प्रिंटर, संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

महात्मा फुले मंडई परिसरात पहिली कारवाई

पोलिस हवालदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना एक संशयित व्यक्ती बनावट नोटा घेऊन महात्मा फुले मंडई परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली १४ ऑक्टोबर २०२६ रोजी शुक्रवार पेठेतील म्हसोबा मंदिरासमोरील अंतर्गत रस्त्यावर सापळा रचण्यात आला.

यावेळी सलमान जैनुद्दीन राजे (वय ३०, रा. आंबेगाव, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) याच्याकडून ५०० रुपयांच्या ८०५ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४४/२०२६ नोंदविण्यात आला.

सातारा आणि कोल्हापूरमधून अन्य तीन आरोपी ताब्यात

अटक केलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता त्याचे आणखी तीन साथीदार असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांचे पथक सातारा आणि कोल्हापूर येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शाफाज फिरोज अन्सारी (वय ३०, रा. नालासोपारा), विशाल विलास गलांडे (वय ३७, रा. स्वरूपखानवाडी, ता. माण, जि. सातारा) आणि अभिजीत रावसाहेब कांबळे (वय ३०, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

शाफाज फिरोज अन्सारी याच्या राहत्या घरातून ५०० रुपयांच्या आणखी ३२३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरला जाणारा EPSON कंपनीचा प्रिंटर, HP कंपनीचा मॉनिटर, Lenovo कीबोर्ड-माऊस, Zebronics कंपनीचा CPU आणि अन्य साहित्य असा एकूण २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे आणि रमेश लाहिगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबूब मोकाशी तसेच सचिन कदम, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, शैलेश सुर्वे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

विश्रामबाग पोलिसांच्या या कारवाईमुळे बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोक मिरर टाइम्स | पुणे


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!