पुणे | प्रतिनिधी लोक मिरर टाइम्स
पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईदरम्यान सहा बांगलादेशी महिला आढळून आल्या असून, त्यांच्याशी संबंधित एका एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक कांबळे व पोलीस उपनिरीक्षक मखारे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुडाळे, फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे व महिला पोलीस उपनिरीक्षक गाडीलवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली.
या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या एजंटसह आणखी दोन पाहिजे असलेल्या आरोपींविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Views: 63














