पुणे (लोक मिरर टाइम्स) लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गहाळ झालेले एकूण ६ मोबाईल फोन शोधून काढत ते संबंधित तक्रारदारांना परत केले. या मोबाईल फोनची एकूण किंमत १ लाख ८० हजार रुपये असून, मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.
लोहगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध नागरिकांचे मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या मोबाईलचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी तपास पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मोबाईलचा शोध घेतला.
या कारवाईत एकूण ६ मोबाईल फोन हस्तगत करून त्यांची पडताळणी करण्यात आली व ते संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ अविनाशकुमार, सहायक पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांच्यासह पोलीस अंमलदार दादासाहेब बडे, बाळासाहेब शिरसाठ, जोतीराम देवकाते, ज्ञानदेव आवारी, अल्पेश पोटकुले, शैलेश कुडले, प्रीतम जंगम, बबलू भिसे आणि मोहन पालवे यांनी सहभाग घेतला.














