पोलिस प्रशासन न्यूज.

मोक्का गुन्ह्यातील आरोपीला अटक; युनिट-३ गुन्हे शाखेची कारवाई


पुणे | प्रतिनिधी मोक्का अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या  पाहिजे आरोपी निखील ठोंबे  याला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-३ पथकाने अटक केली. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी मांजरी बुद्रुक येथील श्री बालाजी अपार्टमेंटमध्ये ही कारवाई करण्यात आली. अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, आर्म्स ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते.

दरम्यान, पोलीस अंमलदार आशिष राठोड यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. पोलीस अंमलदार अतुल साठे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मांजरी बुद्रुक येथे असल्याची खात्री केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व पथकाने श्री बालाजी अपार्टमेंट परिसरात सापळा रचला. परिसराला सर्व बाजूंनी वेढा घालून आरोपीला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी कोथरूड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, महिला सहाय्यक पोलीस फौजदार अर्चना वाघमारे, पोलीस अंमलदार अतुल साठे, किशोर शिंदे, विपुल गायकवाड, कैलास लिम्हण, आशिष राठोड आणि पुरुषोत्तम गुन्ला यांनी ही कामगिरी केली.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!