पोलिस प्रशासन न्यूज.

पिंपरी-चिंचवडमध्ये ५० लाखांच्या चोरीचा अवघ्या ८ तासांत छडा!


पिंपरी-चिंचवड : कारमध्ये ठेवलेले ५० लाख रुपये बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या आठ तासांत ताब्यात घेतले आहे. या कारवाईत चोरीस गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलीस ठाण्याच्या पथकांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.५० ते १२.१५ वाजण्याच्या सुमारास पुनावळे येथील  हॉटेलसमोरील सिमेंटच्या सर्व्हिस रोडवर पार्क केलेल्या कारचे लॉक बनावट चावीने उघडण्यात आले. त्यानंतर कारमध्ये ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेण्यात आली. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखा आणि रावेत पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.
पथकांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, एक इसम बनावट चावीने कार उघडून रोकड असलेली बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले. पुढील तपासात फिर्यादीसोबत मुंबई येथे पैसे आणण्यासाठी गेलेल्या दोन इसमांपैकी चारुदत्त शिवाजी बेंडाले याच्यावर संशय निर्माण झाला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या मित्राला कारची बनावट चावी देऊन कारमध्ये ५० लाख रुपये असल्याची माहिती दिली आणि रोकड चोरी करण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी प्रसाद शिवाजी बनकर  याला चिंबळी येथून ताब्यात घेतले. तसेच चारुदत्त शिवाजी बेंडाले  यालाही ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली असून, त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) सुदर्शन राठोड आणि वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुन्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत, मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, राहुल खिळे तसेच पोलीस अंमलदार विक्रम कुदळ, कृष्णा शितोळे, गोविंद चव्हाण, आशिष बोटके, गणेश सावंत, विनोद वीर, शामसुंदर गुट्टे आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार रमेश कारके यांनी सहभाग घेतला.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!