पोलिस प्रशासन न्यूज.

पुणे गुन्हे शाखा युनिट-१चा छापा; लँडमार्क सोसायटीतील गोडाऊनमधून ९.८९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक


पुणे : शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखा युनिट-१ ने कारवाई केली आहे. कादरभाई चौक परिसरातील लँडमार्क हाऊसिंग सोसायटीच्या तळमजल्यावरील गोडाऊनमध्ये छापा टाकून पोलिसांनी तब्बल ९ लाख ८९ हजार ४२७ रुपयांचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुपारी जप्त केली आहे. या प्रकरणी उबेद आसिफ अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले आहे. दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-१ चे पथक गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई आणि अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस हवालदार महंमदहनिफ शौकत शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत लँडमार्क हाऊसिंग सोसायटीतील गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने संबंधित गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी उबेद आसिफ अन्सारी हा इसम तेथे आढळून आला. तपासणीदरम्यान त्याच्या ताब्यात विक्रीसाठी साठवून ठेवलेला विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुपारी असा एकूण ९,८९,४२७ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा कर्करोग आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका असतानाही विक्रीच्या उद्देशाने हा साठा करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक धिरज राऊत, पोलीस हवालदार प्रमोद जगताप, विनोद चव्हाण, बाबा दांगडे, संतोष नागरे, संतोष अनुसे, महिला पोलीस हवालदार रेश्मा कंक, राजकुमार अबनावे, गणेश गोसावी, आशिष खरात, पोलीस अंमलदार उमेश शेलार आणि अविनाश दळवी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!