मुंबई : (सुनील सांबारे)पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना उल्लेखनीय प्रशासकीय सेवेबद्दल जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal) ९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदान करण्यात आले. मुंबईतील लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित पदक अलंकरण समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते त्यांना हे पदक देऊन गौरविण्यात आले.
विनय कुमार चौबे यांना १५ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले होते. प्रशासकीय सेवेत केलेले उल्लेखनीय कार्य आणि कर्तव्यनिष्ठेची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर झाला होता.
या पदकामुळे चौबे यांच्या उल्लेखनीय सेवेचा गौरव झाला असून, पिंपरी-चिंचवड पोलीस दलासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Views: 55














