पोलिस प्रशासन न्यूज.

४,६०० किलोमीटरचा प्रवास करत विश्रामबाग पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; हरियाणातील तीन आरोपी अटकेत


पुणे | टीम लोक मिरर टाइम्स गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला. गुजरात आणि हरियाणा पोलिसांच्या मदतीने ४ हजार ६०० किलोमीटरचा प्रवास करत पलवल येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत ९ गुन्हे उघडकीस आले असून, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी हरियाणातील पलवल येथील असल्याची माहिती मिळाली. संशयित आरोपी गुजरातमधील अरवली पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समोर आल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात त्यांनी गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीदरम्यान ९ चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले.

अटक आरोपी

१. अजय समशेर विनोदकुमार रुपसिंग कोळी (वय २०), रा. समसाबाद, पलवल, हरियाणा.

२. अमन समशेर अनिल कुमार नारायणसिंग कोळी (वय २४), रा. आदर्श कॉलनी, पलवल, हरियाणा.

३. दीपक समशेर राजुभाई सापसिंग (वय २१), रा. हिरानगर कॉलनी, पलवल, हरियाणा.

२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींच्या वापरातील १० लाख रुपये किमतीची हरियाणा पासिंगची मारुती सुझुकी एर्टिगा कार (क्रमांक HR 30 AC 3390) तसेच नऊ गुन्ह्यांमधील १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन महिन्यांत ६२ गुन्हे उघडकीस

विश्रामबाग पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये तपास करून ६२ गुन्हे उघडकीस आणले. या कारवायांत १ कोटी २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक आयुक्त अनुजा देशमाने तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

विश्रामबाग पोलिसांच्या या आंतरराज्यीय कारवाईचे कौतुक होत आहे.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!