पोलिस प्रशासन न्यूज.

वाकड पोलिसांची धडाकेबाज कारवाई! घड्याळ दुकानफोडीतील दोन चोरटे अटकेत; ९.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त


पिंपरी चिंचवड:टीम( लोक मिरर टाइम्स) थेरगाव येथील डांगे चौकाजवळील ‘लाले चष्मेवाले अँड वॉचेस’ या दुकानाचे छताचे पत्रे उचकटून महागडी घड्याळे चोरी करणाऱ्या दोन आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चोरीस गेलेली १०८ महागडी घड्याळे, गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिव्हा दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ९ लाख ८४ हजार ७७० रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. अमीर शब्बीर शेख (वय २८) आणि इरफान हमीद मुलानी (वय २९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी दुकानातील सीसीटीव्ही डीव्हीआरदेखील चोरून नेला होता. मात्र, वाकड पोलिसांच्या तपास पथकाने परिसरातील १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे व तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!