पुणे : सुनील सांबारे ( लोक मिरर टाइम्स )दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पुणे या संस्थेचा विशेष गौरव सन्मान सोहळा व गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण समारंभ शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी कॅम्प येथील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉलमध्ये उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रा. वसंत हंकारे प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून उपस्थित होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात २० जून १९२० रोजी स्थापन झालेल्या या संस्थेला १०६ वर्षे पूर्ण झाली आहेत. संस्थेचे सुमारे १५,१९३ पोलीस अधिकारी व अंमलदार सभासद असून, संस्थेचे वसूल भागभांडवल ४३९ कोटी रुपये आहे. सभासदांकडून ९८१ कोटी रुपयांची कर्जबाकी येणे असून, आकर्षक व्याजदर व पारदर्शक कामकाजामुळे संस्थेत १०६ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी जमा आहेत. या सोहळ्यात संस्थेच्या सभासदांच्या एकूण ४९४ पाल्यांना १९ लाख ३८ हजार रुपयांची रोख पारितोषिके वितरित करण्यात आली. तसेच उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या ९ विद्यार्थ्यांना टॅब आणि एका विद्यार्थ्याला लॅपटॉप देऊन गौरविण्यात आले. संस्थेने सभासदांसाठी सुरू केलेल्या अपघात सुरक्षा कवच विमा योजनेअंतर्गत अपघाती निधन झालेल्या सभासद कै. भगवंत चिंधू मुठे यांच्या पत्नी श्रीमती सुनीता भगवंत मुठे यांना २० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. या योजनेमुळे अपघातात सभासदाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळणार आहे. तसेच २ सप्टेंबर २०२६ पासून सुरू करण्यात आलेल्या आरोग्य विमा योजनेअंतर्गत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत ११० सभासद व त्यांच्या कुटुंबीयांनी एकूण ९२ लाख ६७ हजार ४५२ रुपयांच्या आरोग्य विमा क्लेमचा लाभ घेतला आहे.
कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी व संचालक उपस्थित
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अनिल मनोहर भोंग, उपाध्यक्ष सुमित कदम, मानद सचिव जमीर तांबोळी आणि खजिनदार दिनेश गडांकुश उपस्थित होते. तसेच संचालक मंडळातील शशिकांत नरुटे, सागर घोरपडे, राजेंद्र मारणे, वैशाली गोडगे, आशा राठोड, गणपत गोरे, आकाश फासगे, महेश गायकवाड, पितांबर गंबरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या १०६ वर्षांच्या वाटचालीत सभासदांचे हित, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रोत्साहन, आरोग्य सुरक्षा आणि अपघातग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या सोहळ्यातून अधोरेखित झाला.














