पोलिस प्रशासन न्यूज.

स्वारगेट बसस्थानकातून घरफोडीच्या गुन्ह्यातील वर्षभरापासून फरार सराईत आरोपीला अटक


पुणे : पुणे शहरात पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यात सुमारे एक वर्षापासून फरार असलेल्या सराईत आरोपीला स्वारगेट बसस्थानक परिसरातून जेरबंद केले. रोहित दीपक सातपुते (वय २१, रा. घोरपडे पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी युनिट-२ चे पोलीस अंमलदार महेश मंडलिक व संतोष टकले यांना गोपनीय माहिती मिळाली की, पर्वती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी रोहित सातपुते हा स्वारगेट एसटी बसस्थानक परिसरात फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सदर आरोपी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५१/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४) अन्वये दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात पाहिजे होता. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पर्वती पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी हा अभिलेखावरील घरफोडी करणारा गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. गोहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश गाने, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोहार, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर नेवसे यांच्यासह पोलीस अंमलदार महेश मंडलिक, संतोष टकले, कुंदन शिंदे, नागनाथ राख, सर्जेराव सरगर, शंकर कुंभार, योगेश मांढरे, ओमकार कुंभार, विजय पवार, आशिष यादव, विनायक वगारे आणि महिला पोलीस अंमलदार विद्या शिंदे यांच्या पथकाने केली.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!