पिंपरी चिंचवड 🙁 सुनील सांबारे)पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने संशयित पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, चौकशीत दोन घरफोडी आणि दोन वाहन चोरीचे असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले आणि पथक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी संशयित हालचाली आढळून आल्याने रुषीकेश राजेंद्र भोसले (वय २५, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे), अशोक राजेंद्र भोसले (वय २५, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांच्यासह अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपींकडून एमएच १३ सीए ८६२८ आणि एमएच १४ बीडब्ल्यू ३९२७ क्रमांकाच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्यानंतर करण्यात आलेल्या सखोल चौकशीत आरोपींनी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची माहिती समोर आली.
चार गुन्हे उघडकीस
उत्तर चाकण पोलीस ठाणे – गु.र.नं. ९३०/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२)
उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाणे – गु.र.नं. १३१/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२)
चिखली पोलीस ठाणे – गु.र.नं. २३९/२०२६, भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ)
चिखली पोलीस ठाणे – गु.र.नं. ३८७/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०५, ३३१(४)
यातील संबंधित आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी उत्तर चाकण आणि उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ डॉ. सुदर्शन राठोड यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट-४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली.














