पोलिस प्रशासन न्यूज.

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! चेन स्नॅचिंगचे दोन आरोपी अटकेत; सहा गुन्हे उघडकीस, ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत


दौंड, पुणे ग्रामीण :(टीम लोक मिरर टाइम्स) पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा तपास करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दौंड, यवत, वडगाव निंबाळकर आणि जेजुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण सहा गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून सुमारे ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक मोटारसायकल असा एकूण ९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्ह्यांची वेळ आणि आरोपींची कार्यपद्धती यांचा अभ्यास करून तपास सुरू केला. समान कार्यपद्धती असलेल्या गुन्ह्यांची माहिती एकत्रित करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यांमध्ये दीपक बलभीम पवार (वय २८, रा. आरोळे वस्ती, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि युवराज सचिन लोखंडे (वय २४, रा. उद्धट, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने जामखेड येथील आरोळे वस्ती परिसरात शोधमोहीम राबवून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण ९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सहा गुन्ह्यांची उकल

या कारवाईत पुढील गुन्हे उघडकीस आले आहेत :

१. दौंड पोलीस ठाणे – गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७२/२०२६
२. दौंड पोलीस ठाणे – गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३२/२०२६
३. यवत पोलीस ठाणे – गुन्हा रजिस्टर क्रमांक ९६४/२०२६
४. यवत पोलीस ठाणे – गुन्हा रजिस्टर क्रमांक ९३०/२०२६
५. वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे – गुन्हा रजिस्टर क्रमांक १६३/२०२६
६. जेजुरी पोलीस ठाणे – गुन्हा रजिस्टर क्रमांक २०५/२०२

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि दौंड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुसाहेब धडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राऊत, पोलीस उपनिरीक्षक शंकर वाघमारे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस ठाणे करत आहे.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!