पोलिस प्रशासन न्यूज.

चिखली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवघ्या ८ तासांत तिघांना अटक; ७३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत


पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी सुनील सांबारे
तळवडे येथील ज्योतिबानगर परिसरात एका ६० वर्षीय महिलेचे हातपाय बांधून, मारहाण करत चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती. या गंभीर गुन्ह्याचा छडा चिखली पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने अवघ्या ८ तासांत लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून अंदाजे ७३ तोळे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण ५७ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास ज्योतिबानगर, तळवडे येथे तीन अनोळखी व्यक्तींनी घराच्या हॉलचे दार तोडून प्रवेश केला. त्यानंतर झोपलेल्या भारती मारुती भालेकर (वय ६०) यांचे हातपाय बांधून, तोंडावर साडीचा तुकडा टाकून मारहाण केली व चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चांदीचे पैंजण, मोबाईल व घड्याळ असा सुमारे ५३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ६९१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी ७० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे प्रथम अनारकुल्ला मजहरउल्ला चौधरी (वय ३६) याला ताब्यात घेतले. त्यानंतर अब्दुल रहीम मजीद मोमीन (वय ३१) आणि समीमुल्ला अजमतउल्ला खान (वय ३२) या अन्य दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींकडून सोन्याचे दागिने, चांदीचे तीन जोड पैंजण, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त प्रविण मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्यासह पोलीस हवालदार किरण काटकर, विनोद होनमाने, कंकण्या स्वामी, प्रविण भामोळे, सुरज सुतार, अरुण साबळे, संतोष भालेराव, अजय गायकरवाड, भरत माने, नवनाथ कुंभार, पोलीस शिपाई अनिल राठोड आणि संतोष भोर यांनी सहभाग घेतला.
अवघ्या आठ तासांत गंभीर गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक केल्याने चिखली पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!