पुणे, (लोक मिरर टाइम्स) दि. १५ ऑक्टोबर २०२६ : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाने समर्थ पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यात मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. मोईन आसिफ घोडके (वय २५, रा. भवानी पेठ, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-१चे पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार प्रमोद जगताप व पोलीस अंमलदार उमेश शेलार यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी मोईन घोडके हा त्याच्या राहत्या घराजवळ आल्याची माहिती मिळाली.
ही माहिती प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना कळविण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय, अतिरिक्त कार्यभार गुन्हे) श्री. पी. आर. पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राऊत, पोलीस हवालदार प्रमोद जगताप, उमेश शेलार, किरण मोरे, सचिन कोळी आणि अविनाश दळवी यांनी सहभाग घेतला.














