पोलिस प्रशासन न्यूज.

पुण्यात अपघात करून वाहनचालक फरार; दुचाकीस्वाराचा मृत्यू, माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन


पुणे | लोक मिरर टाइम्स पुण्यातील जेल रोड परिसरात दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरून फरार झालेल्या अज्ञात वाहनचालकाचा विमानतळ पोलिसांकडून शोध सुरू आहे. या अपघातात दुचाकीस्वार केविन विनायक राऊत (वय २७) यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८:२० वाजता ५०९ चौकाजवळ, बिडकर नर्सरीसमोरील बसस्टॉप परिसरात हा अपघात घडला. अज्ञात वाहनचालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी १८ ऑक्टोबर रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातातील संबंधित वाहनचालकाला दुखापत झाली असण्याची शक्यता असून, त्याने कोणत्याही रुग्णालयात उपचार घेतले असल्यास त्यासंबंधी माहिती पोलिसांसाठी महत्त्वाची ठरू शकते.

या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शी किंवा वाहन व चालकाची माहिती असलेल्या नागरिकांनी विमानतळ पोलीस ठाणे, पुणे शहर येथे ९१५५५६१९५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!