पोलिस प्रशासन न्यूज.

तळोजा गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी आंबेगाव पोलिसांच्या ताब्यात


पुणे | लोक मिरर टाइम्स नवी मुंबईतील तळोजा परिसरात आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका तरुणाला मारहाण करून त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींना पुणे शहरातील आंबेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दत्तनगर परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १ वाजून १७ मिनिटांनी तळोजा, फेज-२ येथील शिवाजी चौकाजवळील मारवा बिल्डिंगच्या खाली आर्थिक व्यवहाराच्या वादातून आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर पिस्तुलातून गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी पुण्यातील दत्तनगर परिसरात असल्याची माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे व सचिन गाडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे : १. रुद्र दादासाहेब बारवकर
२. अनिकेत प्रताप नरवडे
३. सौरभ गोरख चौधरी

ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, पोलीस उपायुक्त सागर कवडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

  1. आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तसेच पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, अजय कामठे, सुभाष मोरे, शिवाजी पोटोळे आणि फिरोज शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!