पोलिस प्रशासन न्यूज.

दिवाळी संपेपर्यंत बाजीराव रोड व शिवाजी रोडवर जड वाहनांना बंदी


पुणे : टीम लोक मेरी टाइम्स दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दि. २५ ऑक्टोबर २०२६ पासून दिवाळी सण संपेपर्यंत बाजीराव रोड आणि शिवाजी रोडवर जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.

लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड आणि तुळशीबाग या परिसरात दिवाळीनिमित्त नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळणे, पादचाऱ्यांची सुरक्षितता राखणे आणि बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सामान्यतः दर शनिवारी आणि रविवारी जड वाहनांना या मार्गांवर दिली जाणारी वाहतुकीची शिथिलता दिवाळी सण संपेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कालावधीत जड वाहनांना बाजीराव रोड आणि शिवाजी रोडवरून वाहतूक करता येणार नाही.

ही अधिसूचना मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार जारी करण्यात आली असून, डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त, वाहतूक, पुणे शहर यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोक मिरर टाइम्स


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!