पोलिस प्रशासन न्यूज.

मुंढव्यात गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या तरुणाला अटक; १.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त


पुणे : टीम(लोक मिरर टाइम्स)मुंढवा परिसरातील शरद नगर, गायरान वस्ती येथे गांजा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेने अटक केली. सनी शाम गुमाने (वय २७, रा. केशवनगर, गायरान वस्ती, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दि. ३० ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या पथकाला पोलीस अंमलदार संदीप शिर्के यांच्यामार्फत मुंढवा येथील शरद नगर परिसरात गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित सनी गुमाने याला ताब्यात घेतले.  त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडे ३ किलो २५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्याची किंमत १ लाख ५१ हजार २५० रुपये असून, १० हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख ६१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.  याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७७/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त हसन गौहर आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर, महिला पोलीस उपनिरीक्षक आशा भिंगारे व पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी केली.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!