पोलिस प्रशासन न्यूज.

कारेगावमध्ये अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; ६५ वर्षीय आरोपी अटकेत


शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला रांजणगाव MIDC पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शेजारी खेळण्यासाठी गेलेली बालिका घरी परतत असताना आरोपीने तिला आवाज देऊन बोलावले. त्यानंतर तिला घरात नेऊन लैंगिक अत्याचार तसेच अप्राकृतिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता, पोक्सो कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही महिला पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी केली.

बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अल्पवयीन बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी जनजागृती, सतर्कता आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!