पोलिस प्रशासन न्यूज.

पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज विक्री करणारे दोन आरोपी अटक; ४.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त


लोक मिरर टाइम्स | पुणे

पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने पुणे पोलिसांकडून अंमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने मेफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे.

दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे अधिकारी व कर्मचारी पुणे शहरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कॅम्प परिसरातील क्लोव्हर सेंटर, जे. जे. गार्डनसमोरील सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचण्यात आला.

यावेळी दोन पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हा दुचाकींवर संशयास्पदरीत्या थांबलेल्या दोन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची नावे १) परवेज जाफर शेख (वय ३५, रा. मनिष पार्क, कोंढवा, पुणे) आणि २) नबील नुरमोहम्मद शेख (वय ३४, मूळ रा. लोणावळा, सध्या रा. साळुंखे विहार, वानवडी, पुणे) अशी आहेत.

पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये आरोपींकडून १०२.६० ग्रॅम वजनाचे, अंदाजे ३ लाख ७ हजार ८०० रुपये किमतीचे मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन अॅक्टिव्हा दुचाकी आणि तीन मोबाईल हँडसेट असा एकूण ४ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध लष्कर पोलीस ठाणे, पुणे येथे एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क), २२(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अंमली पदार्थ विरोधी पथक-१ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर, महिला पोलीस उपनिरीक्षक आशा भिंगारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल साळुंखे तसेच पोलीस अंमलदार अविनाश रेडके, तुषार साळुंके, अमोल सरडे, विशाल भिलारे, अतुल क्षिरसागर, अमरनाथ लोणकर, निलेश जाधव, किरण जाधव, संदीप शिर्के, प्रेमा धारुरकर, मंगेश गुंड, सद्दाम शेख आणि अक्षय शिर्के यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!