पुणे : (लोक मिरर टाइम्स) समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सचिन यशवंत रणवरे (वय ४८) याला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने हडपसर परिसरातून ताब्यात घेतले.
समर्थ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक १२२/२०१५ मध्ये भारतीय दंड विधान कलम ४०६, ४२०, ४६५, ४६८, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी पत्ता बदलून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पथकाने हडपसर येथील गंगोत्रीनगर परिसरात जाऊन खात्री केली. त्यानंतर संशयित आरोपी सचिन यशवंत रणवरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीबाबत समर्थ पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली.
कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक : दीपक लगड
सहायक पोलीस निरीक्षक : धिरज राऊत
पोलीस हवालदार : प्रमोद जगताप पोलीस हवालदार : उमेश शेलार
आशिष खरात पोलीस अंमलदार : रेश्मा कंक














